किनगाव-डांभूर्णी रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर पलटी; चालक गंभीर जखमी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव ते डांभूर्णी रस्त्यावर डांबरीकरणाचे हॉट मिक्सचे वाहतूक करणाऱ्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. 

अधिक माहिती अशी की,  २८ जुन रोजी किनगाव ते डाभुर्णी मार्गा वरील डाभुर्णी गावा जवळ किनगावकडून डांभुर्णी गावाकडे जाणारा डंपर वाहन क्रमांक (एमएच १९ वाय ५७१८) हे चारचाकी वाहन डांबरीकरण कामाचे हॉट मिक्स हे साहीत्य घेवुन जातांना पाऊस सुरू असतांना वाहनचालकाचा ताबा वाहनाचे तोल बिघडल्याने वाहन रस्त्याच्याकडे जावुन पलटी झाला. या अपघातात वाहनचालक हा गंभीर जखमी झाला आहे.  वाहनचालकास उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातासंदर्भात पोलीसात अद्याप कुठलीही नोंद झालेली नाही. या भिषण अपघातातून केवळ सुदैवाने चालक बचावल्याचे प्रत्येक्ष पाहणाऱ्यांनी म्हटले आहे. अधिक माहीती घेतली असता सदरचे वाहन भुसावळ येथील एका मोठया प्रसिद्ध बांधकाम ठेकेदाराचे असल्याचे कळते.

Protected Content