कलाग्रामच्या उभारणीतून नशिराबादचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार : श्याम कुमावत

 

जळगाव, प्रतिनिधी । ‘कलाग्रामच्या उभारणीतून नशिराबादचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय’, असे प्रतिपादन व्रतस्थ कला उपासक श्याम कुमावत यांनी केले. ते भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते.

श्याम कुमावत यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या ” चित्रस्वामी ” निवासस्थानी भिशीचे समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवसेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनिल दाभाडे होते. प्रमुख अतिथी हेमंत सावकारे , श्रीराम विचवे, योगेश कोलते, प्रताप कुमावत, प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते. मध्यप्रदेश संस्कृति परिषद कालिदास संस्कृत अकादमी उज्जैन आयोजित राष्ट्रीय कालिदास समारोह २०२० मध्ये श्याम कुमावत यांच्या ” ग्रीष्मवर्णन सम्पूर्ण ” पेंटिंगला देशभरातून आलेल्या १६५ पेंटींग्ज मधून आलेल्या कलाकृतींमधून ‘राष्ट्रीय कालिदास चित्रकला’ सन्मानाचा राष्ट्रस्तरीय एक लाखाचा पुरस्कार प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ सत्कार करण्यात आला.

विजय लुल्हे म्हणाले की ,’ श्याम सरांच्या सृजनशिलतेत भारतीय संस्कृती व परंपरा यांचे मनोवेधक कलेचं अद्वैत आहे.’ सुनिल दाभाडे भाषणात म्हणाले की, रेषेचीअलंकृत प्रमाणबद्धता व गतिशीलता हा पिताश्रींचा कला वारसा सरांना जन्म जात मिळाला आहे. कलाग्राम उभारण्याचे उद्दिष्ट्ये, नियोजनाचा आराखडा, आजतागायत केलेली कार्यवाही व तरतुदी याबाबत अनौपचारिक सांगोपांग चर्चा कुमावत यांनी केली.

दुसऱ्या सत्रात विश्वकर्मा पंच मडळातर्फे कमर्शियल आर्टिस्ट संजय जाधव यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ देऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमावत सरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विश्वकर्मा पंच मंडळाचे माजी सचिव मधुकर जाधव व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पेंटर यशवंत जाधव व विश्वकर्मा पंच मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळकर यांनी सहकार्य केले.
सूत्रसंचालन व आभार डॉ. दिपक लोखंडे यांनी मानले.

Protected Content