हिंगोणे गावाजवळील महामार्गावरील वळणास अपघातप्रणव क्षेत्र घोषित करा वाहनधारकांची मागणी

 

यावल, प्रतिनिधी।तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील हिंगोणा गावाजवळील अत्यंत धोकादायक वळणाने अनेक निष्पाप नागरीकांचे बळी घेतले आहेत. हे क्षेत्र यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रणव क्षेत्र म्हणून घोषित करून त्या स्वरूपाचे फलक लावण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

यावल ते फैजपुर या मार्गावरील हिंगोणा गावाजवळ साधारण एक किलोमिटर लांब असलेल्या वळणावर वारंवार अपघात होवुन यात निष्पाप नागरीकांचे बळी जात आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात या वळणावर विविध अपघात होवुन सुमारे १७ जणांना आपला जीव गमवावे लागले आहेत. मागील वर्षीच झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जणांचा दुदैवी अंत झाला. दोन दिवसापुर्वी एक चारचाकी वाहनाच्या अपघात ११ महीला या गंभीर जख्मी झाल्या होत्या. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. या वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेता यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या वळणाच्या मार्गावरील क्षेत्राला धोक्याचे वळण म्हणुन घोषीत करून तसे सुचना फलक त्या ठिकाणी लावावे जेणे करून भविष्यात अशा प्रकारे होणाऱ्या भिषण अपघातांच्या घटनांना टाळता येईल अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content