कोरोना काळात विद्यार्थी स्पर्धेपासून वंचित राहू नयेत म्हणून कलाध्यापकांची धडपड

 

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । येथे नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अंतर्गत शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे, मात्र, शासनाचे नियम पाहता विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून ही स्पर्धा घेणे अवघड असतांना कलाध्यापक नंदू पाटील यांच्या पुढाकाराने ३२ विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून सहभाग नोंदविला.

कोरोना प्रादुर्भाव काळात नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अंतर्गत चित्रकला स्पर्धाचे आयोजन शालेय स्तरावर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी या स्पर्धेला कसे हजर राहतील ? स्पर्धा कशा आयोजित कराव्या ? अशा एक ना अनेक समस्या होत्या. विद्यार्थी या स्पर्धेला मूकतील अशी परिस्थिती होती.  तेव्हा कलाध्यापक नंदू पाटील यांनी, विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन सविस्तर माहिती आणि साहित्य पुरविण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला.

विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. त्यामुळं प्रत्येक वर्गाचे स्वतंत्र व्हाट्सएपचे ग्रुप आहे. त्या ग्रुपवर या चित्रकला स्पर्धेची प्राथमिक माहिती देउन विद्यार्थ्यांना नंदू पाटील यांनी मार्गदर्शन केले व इच्छुकांनी सरांना त्यांच्या पर्सनल नंबरवर सम्पर्क करून आपआपली नावे नोंदवली. अशा एकूण सर्व ३२ विद्यार्थ्यांना नंदू पाटील यांनी ड्रॉइंग पेपर व इतर साहीत्य घरोघरी जाऊन पुरविले
घरबसल्या एका स्पर्धेची संधी चालून आली म्हणून खूप दिवसांनी घरात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आनंद झाला. आपले शिक्षक आपल्या घरापर्यंत आपल्याला साहित्य देण्यास आले याचा आनंद विद्यार्थ्यांना झाल्याचे पाहून शिक्षकांना सुद्धा समाधान वाटले.  शिक्षक घरी आले हे पाहून पालकही सुखावले आणि कोरोनाचे सावट असल्यावर सुद्धा, त्यांनी माझे अतिशय जिव्हाळ्याने आणि आपुलकीने स्वागत केले . अश्या भावना नंदू पाटील यांनी व्यक्त केल्या.
आपल्या पाल्याच्या अभ्यासाबद्दल शाळेच्या परिस्थितबद्दल , कधी सुरु होतील?, कशा प्रकारे काळजी घेतली जाईल?, मुलाच्या वर्षचे काय? अशा अनेक चिंता व काळजी व्यक्त करणारे प्रश्न पालकांनी उपस्थित केले. कोरोना काळातील हा ही एक वेगळा अनुभव विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक अनुभवत आहेत. नंदू पाटील यांच्या या प्रयत्नांचे शाळेचे मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे, व पर्यवेक्षक जे. व्ही. तायडे यांनी कौतुक केले आहे.

Protected Content