फेस मास्क आवश्यक : आरोग्य संघटनेतर्फे नवीन दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाचा प्रकोप कमी झालेला नसतांना जागतिक आरोग्य संघटनेने याचा संसर्ग टाळण्यासाठी फेस मास्क आवश्यक असल्याचे सांगत, याबाबतचे नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने जारी केलेल्या शिफारशींमध्ये फेस मास्कच्या वापराची शिफारस करण्यात आली आहे. यात की ज्या भागात कोरोना पसरत आहे. तेथे १२ वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांसह सर्वांनीच फेस मास्कचा वापर करावा. यासोबत दुकाने, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थानांमध्ये खेळती हवा नसल्यास फेस मास्क अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, नवीन निर्देशानुसार घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. जेथे हवेचे चांगले व्यवस्थापन आहे, मात्र, आपसांत एक मिटरचे अंतर ठेवणे शक्य नाही, अशा ठिकाणीही फेसमास्कचा अवश्य वापर करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे.

Protected Content