एरंडोल येथे ‘आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन’तर्फे गरजूंना अन्नदान

एरंडोल प्रतिनिधी । देशात व राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हातमजूरी व गरजू नागरीकांची उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील अराग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्यावतीने ४०० जणांना अन्नदान करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल येथील भवानी नगर परिसरात लॉक डाऊनमुळे बेरोजगारीमुळे उद्भवलेल्या गोरगरिबांच्या पोटपाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन’तर्फे जेवण देण्यात आले. ४०० हून अधिक लोकांना जेवण देण्यात आले. उपाशी पोटाला जेवण दिल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रयत्न करण्यात आला. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्याने उपाध्यक्ष संदीप ब्रह्मे, खाजिनदार सरोजबाई पाटील, सदस्य संगीताताई पाटील, सदस्य राहुल पाटील प्रवीण भाऊ पाटील तसेच गांधीपुरा मधील मान्यवरांनी सहकार्य केले.

Protected Content