पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । कोरोना योद्ध्यांचे कार्य देवदूतासारखे असल्याचे गौरवोद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन .एस . चव्हाण यांनी काढले. पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा बजावलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात येऊन यथोचित गौरव करण्यात आला. पहूर शहर पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या कठीण काळात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन एस चव्हाण, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजेश सोनवणे, पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . हर्षल चांदा, वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ . संदीप कुमावत, डॉ . सचिन वाघ, यांच्या सह अधिपरिचारक सरोज बेडसे, बळीराम जाधव, भगवान गोयर, आरोग्य रक्षक देवेंद्र घोंगडे यांच्यासह सर्व वैद्यकिय अधिकारी – कर्मचाऱ्यांचा योद्धा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी आरोग्य दूत अरविंद देशमुख, रामेश्वर पाटील, नवनिर्वाचित ग्रा .प . सदस्य राजू जाधव, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे, उपाध्यक्ष डॉ . संभाजी क्षीरसागर, शरद बेलपत्रे, मनोज जोशी, रवींद्र घोलप, किरण जोशी आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते . सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले आभार किरण जोशी यांनी मानले .

Protected Content