बालोद्यानाचे काम थांबल्याने नागरिकांना असुविधा

यावल प्रतिनिधी । येथील बालोद्यानाचे काम रखडल्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या खुल्या भूखंडावर शासनाकडुन मिळणार्‍या लाखो रुपये निधीतुन बाल उद्यानाचे काम अचानक बंद पडल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक आरोग्य विषयी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमध्ये मागील पाच ते सहा महीन्यांपासून सार्वजनिक खुल्या भुखंडावर नगर परिषदच्या माध्यमातुन लाखो रुपये निधीतुन उद्यानाचे व संरक्षण भिंतचे काम सुरू होते मात्र हे काम बंद काही दिवसांपासुन बंद पडल्याने त्या ठीकाणी संबधीत ठेकेदाराने परिसरात राहणार्‍या नागरीकांच्या घरातील जाणार्‍या वापराचे दुर्गंधी व घाणी सांडपाण्याची नाल्यातील वाट बंद केल्याने त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर दुर्गंधीचे घाण पाण्याचे डबके साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे.

या कामाच्या ठेकेदाराने यावल शहरात नगर परिषदच्या माध्यमातुन केलेल्या कोटयावधी रूपयांच्या विविध कामांच्या गुणवत्तेबद्दल नागरीकांच्या अनेक तक्रारी ठेकेदाराच्या विरूद्ध असतांना त्यालाच नगर परिषदेने कामे का द्यावी असा प्रश्‍न शहरात चर्चेला जात असुन,आदीच कोरोना संसर्गाच्या भितीच्या सावटाखाली असलेल्या नागरीकांमध्ये आपल्या कुटंबाच्या आरोग्याविषयी चिंता वाटु लागल्याचे दिसत असुन, नगर परिषद प्रशासनाने तात्काळ हे बंद पडलेल्या बांधकाम सुरू करून त्वरीत पुर्णत्वाकडे घेवुन जावे अशी मागणी होत आहे.

Protected Content