मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात तरुण जखमी

यावल – लाईव्ह  ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाघोदा गावाजवळ मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमी  तरूणास उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , आज मंगळवार  दि. २७ सप्टेंबर रोजी  ११ .३० ते १२ वाजेच्या दरम्यान  कल्पेश आनंद पाटील (वय २२ वर्ष रा. थोरगव्हाण ता. यावल) हा आपल्या कडील एमएच १९डी.  टी.  ७५२०या दुचाकी वाहनाने साकळीहुन जळगाव जात असतांना यावल किनगाव मार्गावरील वाघोदा गावा जवळ जी. जे. २३, डब्ल्यु  ७६३५या अवजड वाहनाचा अपघात झाला. यात परेश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून साकळी आरोग्य केन्द्राकडुन जखमी तरूणास तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ केले असता , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अघिकारी डॉ. जिशान खान व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी प्रथमपोचार करून जखमी तरुणाची प्रकृती बघता त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथील वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले आहे . या अपघातातील दुचाकी वाहन व ट्रकचालक अरविंद यादव  यास ट्रकसहीत पोलीस ठाण्यात जमा केले आहे .

 

Protected Content