काँग्रेसशिवाय दुसरे बटन दाबले तर इलेक्ट्रीक शॉक बसेल : मंत्र्याची धमकी

kawasi lakhma 4322601 835x547 m

रायपूर (वृत्तसंस्था) काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला इलेक्ट्रीक शॉक बसेल, असे म्हटल्याने निवडणूक आयोगाकडून छत्तीसगड सरकारमध्ये मंत्री असलेल्या कवासी लक्ष्मा यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मतदारांना धमकी देऊन भीती घातल्याबद्दल लखमा यांना आयोगाने ही नोटीस बजावली आहे. लखमा यांनी मतदारांना भीती घालताना म्हटले की, काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला इलेक्ट्रीक शॉक बसेल, त्यामुळे काँग्रेस उमेदवारालाच मतदान करा.

 

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केले होते. बिरेश ठाकूर यांचे बटण पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे पहिल्याच क्रमांकाचे बटण दाबा, जर दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबले तर तुम्हाला इलेक्ट्रीक करंट बसेल, अशी भीती लखमा यांनी मतदारांमध्ये घातली होती. केवता येथील एका सभेला संबोधित करताना लखमा यांनी उपस्थित जनसमुदायाला काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहन केले.
निवडणूक आयोगाने लखमा यांना नोटीस बजावली असून याप्रकरणी तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तेथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी लखमा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला असून मंत्रीमहोदयांकडून मतदारांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. लखमा यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचाही भंग झाल्याचे उसेंडी यांनी म्हटले होते. दरम्यान, उद्या १८ एप्रिल रोजी कनकेर मतदारसंघात मतदान होत आहे.

Add Comment

Protected Content