अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील रुंधाटी येथील एका 17 वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.
बबन नवल पाटील रा रुंधाटी यांनी फिर्याद दिली की त्यांचा 17 वर्षाचा मुलगा प्रदीप हा 2 तारखेला त्यांना डबा द्यायला शेतात आला होता शेतातून तो घरी निघून गेला होता. मात्र बबन पाटील व त्यांच्या पत्नी सायंकाळी शेतातून घरी गेल्यावर त्यांना त्यांचा मुलगा घरी आढळून आला नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.