निर्भया प्रकरण : नवीन डेथ वॉरंट जारी; दोषींना १ फेब्रुवारीला फाशी

nirbhaya case

नवी दिल्ली प्रतिनिधी । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने सर्व चारही दोषींच्या विरोधात नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. या नव्या डेथ वॉरंटनुसार आता २२ जानेवारी ऐवजी सर्व दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.

मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. मुकेश सिंह याच्या या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पतियाळा हाऊस कोर्टाने म्हटले होते की या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. त्यामुळे शुक्रवारी तिहार तुरुंग प्रशासनाला स्टेटस रिपोर्ट देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

Protected Content