संभाजी ब्रिगेडच्या वतीने एन.आर.सी विरोधात ठिय्या

WhatsApp Image 2020 01 17 at 5.23.46 PM

जामनेर, प्रतिनिधी | नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. एन.आर.सी., सी.ए.ए. सारखे कायदे देशाच्या एकात्मतेला बाधक असून यामुळे देशाची हानी होईल यामुळे असे कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड जामनेर शाखेतर्फे तहसीलदार कार्यालय परिसरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदीप गायके ,मौलाना इमरान, व्ही. पी. पाटील, राजू चौधरी, डॉ. ऐश्वर्यी राठोड, शंकर राजपूत, अशपाक पटेल यांनी उपस्थितांना आंदोलनाची दिशा सांगितली. मुसा पिंजारी, खालीद जकी, रऊफ शेख, रफिक मौलाना, अजहर शेख, अनीस पहेलवान, सईद मुजावर, जुबेर शेख, आदिसह मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

Protected Content