शहीद जवान संजय ठाकरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (व्हिडीओ)

javan thakare

 

पारोळा प्रतिनिधी । जम्मू-काश्मीरमधील सुई कॅम्प येथे (दि.14) रोजी कर्तव्यावर असतांना जखमी झालेल्या देवगाव येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान संजय ठाकरे यांचा बुधवारी सकाळी मृत्यु झाला होता. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.17) रोजी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

यावेळी जळगाव पोलिस मुख्यालयाच्या वतीने शोक सलामी पथकाने शस्रासह राऊंडची सलामी दिली. जम्मू-काश्मिरमधील सुई कॅम्प येथे जखमी झालेले जवान संजय ठाकरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यापुर्वी संजय ठाकरे यांचे पार्थिवाची गावात मिरवणुक  काढण्यात आली. देशभक्तीपर गीत वाजविण्यात आले. तसेच प्रत्येक घरासमोर रांगोळी टाकण्यात आली होती. जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात लोक अंत्ययाञेसाठी दाखल झाले होते. गावातील सर्व महिला, विद्यार्थी देखील अंतयात्रेत सहभागी झाले होते. ‘शहीद जवान संजय ठाकरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सुरज चाँद रहेगा संजय ठाकरे नाम रहेगा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संजय ठाकरे यांचा मुलगा हिमांशु ठाकरे यांनी त्यांना अग्नीडाग दिला.

यावेळी एरंडोल-पारोळा आमदार चिमणराव पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे आर.आर.कँट इंदौर पथकाचे जगदीश शर्मा, सत्यजित सिंग, के.डी.प्रभाकर, एस.एस.चव्हाण व काकरापारा युनिट गुजरात पथकाचे संदिप पाटील, के.आर.पाटील, तहसिलदार ए.बी.गवांदे, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, नायब तहसीलदार पंकज पाटील, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर, उपसरपंच समीर पाटील, नाभिक समाजाचे जिल्हाअध्यक्ष एकनाथ शिरसाठ, आधार पाटील, मनोराज पाटील, नंदकुमार पाटील, देवगाव पोलिस पाटील विश्वास शिंदे यांच्यासह जिल्हा व  तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content