होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची पकडली कॉलर !

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । वाहतूक नियंत्रण  करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली. 

याबाबत वृत्त असे की, सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे यास तू पोलिसांचा ड्रेस का घातला ? तुझे ओळखपत्र दाखव ? असे म्हणत त्यांच्या कानफटात मारली. ही घटना पाहताच पोलीस ललित पाटील व इतर जण आवरायला गेले असता इस्माईल खड्डा याने ललित पाटील यांची कॉलर पकडली. यामुळे होमगार्ड निलेश मराठे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक पाडवी करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!