अल्पवयीन मुलीला पळवून नेणारे अटकेत

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री येथील एका अल्पवयीन मुलीस आमीष दाखवुन पळवुन नेल्याने प्रकरणी पोलिसांनी मुंबई येथुन त्या अल्पवयीन मुलीचे शोध लावण्यात यश मिळवले असुन , मुलीसह तिन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

या संदर्भात दिनांक १९ नोव्हेंबर २० रोजी तालुक्यातील वड्री गावातील साहील उर्फ दादु संजय भालेराव वय १९ वर्ष याच्यासह दोन अल्पवयीन मुलांनी संगनमताने गावातील एका अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेले होते. वर्षानगर विक्रोळी मुंबई आपल्या मित्राकडे घेवुन गेल्याची घटना उघडकीस आली असुन , यावल पोलीसात तक्रार दाखल झाल्यावर पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस कर्मचारी असलम खान यांच्या पथकाने दोन दिवसात गुप्त माहीतीच्या आधारावर त्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले. वड्री गावातील साहील भालेराव व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यातील अल्पवयीन तरूणी व दोन अल्पवयीन मुलांना रवानगी पोलीसांच्या माध्यमातुन बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस कर्मचारी असलम खान यांनी दोनच दिवसात तपासाची चक्रे फिरवुन शिताफीने त्या अल्पवयीन मुलीस शोधण्यात यश मिळवल्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!