विषारी पदार्थ सेवनाने तरुणाचा मृत्यू

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपुर येथील ज्ञानेश्‍वर कैलास भिल (वय २२) याचा विषारी द्रव पदार्थ सेवनाने मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

ज्ञानेश्‍वर भील हा मोल मजुरी करीत होता. काल ता. २० रोजी तो घरी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून गेला होता.र ात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तो एका सार्वजनिक मुतारी जवळ हात पाय झटकत असल्याचा निरोप त्याच्या वडिलांना मिळाला. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता. पुढील उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी तो उपचार सुरू असतांना मृत पावला. याबाबत वडील कैलास भिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content