पहूर येथे रतनलालजी बाफना यांना श्रद्धांजली

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । अहिंसेचे उपासक व शाकाहाराचे प्रणेते रतनलालजी बाफना यांना येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेत आयोजित कार्यक्रमांत आदरांजली अर्पण करण्यात आली. शाकाहाराचा जीवनभर प्रचार आणि प्रसार करत सामाजिक बांधिलकी जोपासलेले रतनलाल सी. बाफना यांच्या श्रद्धांजली सभेच्या सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी माजी जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, किशोर कोटेचा , शैलेश पाटील, ज्ञानदेव करवंदे, अशोक चव्हाण, निवृत्ती पाटील ,पवन रुणवाल , ग्रां. प. सदस्य शरद पांढरे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे आदींनी शोक-सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, जैन समाज बांधव तसेच पतसंस्थेचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन प्रल्हाद वानखेडे यांनी केले. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले.

Protected Content