खंडणीची मागणी करणाऱ्या संशयिताला ठोकल्या बेड्या

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईलेक्ट्रीक दुकान चालू ठेवण्यासाठी १ हजाराची मागणी करत दुकानदाराला बेदम मारहाण करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी २६ मे रोजी मध्यरात्री पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप उर्फ मास रामदास पाटील रा. पहूर ता.जामनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जफरखान पठाण (वय-३३) रा. पहूर पेठ, ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील जामा मिस्जीद येथे ईलेक्ट्रीक दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, गुरूवार २५ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करत असतांना दुकानावर संशयित आरोपी प्रदीप पाटील हा आला. दुकान चालवायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील असे सांगून पठाण यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. व  त्यांच्या खिश्यातून १ हजार रूपये काढून नेते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी  प्रदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.  पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.

Protected Content