पाचोरा येथे दिपावली सांज पाडवा उत्साहात साजरा

पाचोरा प्रतिनिधी । सोना हरी थोरात बहुउद्देशिय संस्था संचलित शाकुंतल संगीत विद्यालय आयोजित दीपावली सांज पाडवा भाव भक्तीगीतांची स्वरधारा दीपावली निमित्त उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक वाल्मिक महाजन (मुंबई), केंद्र संचालक बबन वाघ (कामगार कल्याण केंद्र), पाचोरा येथील सुप्रसिध्द शाहीर विठ्ठल महाजन, एकनाथ महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये पी. बी. सी. मातृभुमीचे संपादक प्रविण ब्राम्हणे, साक्ष न्युजच्या संपादिका गौरी सोनवणे हे होते.

कार्यक्रमात देविदास थोरात, वैष्णवी थोरात, डिगंबर पाटील, रितेश धनराळे, पंकज धनराळे सह अनेक गायकांनी सहभाग नोंदवला. प्रथमतः “गजानना श्री गणराया”, “कानडा राजा पंढरीचा”, “अबीर गुलाल उधळीत रंग”, “निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “कशासाठी येऊ देवा”, “रेश्माच्या रेघांनी” यासारख्या सुमधुर गाण्यांनी खूप प्रतिसाद मिळवला. याप्रसंगी वादकांमध्ये सागर थोरात (तबला), बाल कलावंत संमेक थोरात (तबला), विशाल थोरात (पॅड वादक), अजय सोनवणे (बासरी), सतीश भिसे (की बोर्ड) यांनी गाण्यांच्या तालावर वाद्यांची साथ दिली.

सांज पाडव्याचे  सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन रोशनलाल शर्मा यांनी मानले. सांज पाडवा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी थोरात, पूर्वा थोरात, सार्थक थोरात यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content