पाचोर्‍यातील नवीन तलाठी कार्यालयाचे भूमिपुजन

 

पाचोरा, प्रतिनिधी  । शहरातील नव्या तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन आज आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

 

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जुन्या शहर तलाठी कार्यालयाची वास्तू पाडली गेल्यामुळे नागरिकांना  समस्यांना तोंड द्यावे लागत होते. निधी अभावी शहर तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले होते. आमदार किशोर पाटील यांनी  स्थानिक विकास निधीतून १२ लक्ष रुपयांचा निधी देऊन  इमारत बांधकामासाठी पुढाकार घेतला आहे.

 

आज महसुलदिनी पाचोरा शहर तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा सकाळी संपन्न झाला. तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी  निधी देणारे आमदार किशोर पाटील हे जिल्ह्यातील पाहिले आमदार ठरले आहेत. महसूल प्रशासनाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसीलदार कैलास चावडे, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रविण ब्राह्मणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिपक पाटील, कनिष्ठ अभियंता काजवे, मंडळ अधिकारी  वरद वाडेकर, शहर तलाठी आर. डी. पाटील, पुरवठा अधिकारी अजिंक्य आंधळे, मयूर आगरकर, यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

 

=====================================================================

 

 

 

Protected Content