शिंदाड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील शिंदाड येथे पंचायत समितीचे शिक्षण विभाग व समाज विकास विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन  आ. किशोर पाटील, माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रविण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. समाज विकास विद्यालय, शिंदाड येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या ४५ तर माध्यमिक विभागाचे ५५ विद्यार्थ्यांनी, प्राथमिक शिक्षक विभाग ५, तर माध्यमिक शिक्षक विभाग ५ यांनी भाग घेतला होता. या प्रदर्शनात  विज्ञान – तंत्रज्ञान, खेळ, गणिती मॉडेल, सोलर, प्रदूषण अशा विविध उपक्रमां संदर्भात प्रदर्शन मांडण्यात आले होते.

उद्घाटनप्रसंगी आ. किशोर पाटील यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व फायदे तसेच विद्यार्थ्यांनी मन व मनगट मजबूत करणे तसेच आजचा विद्यार्थी हा भविष्याचा वैज्ञानिक  असल्याचे मत मार्गदर्शनात मांडले.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटातून जे. जे. पंडित विद्यालय, लोहाराची विद्यार्थीनी समिक्षा शिवाजी क्षीरसागर तर माध्यमिक गटात समाज विकास विद्यालय, शिंदाडची विद्यार्थीनी नंदिनी नामदेव परदेशी, अक्षदा उत्तम पाटील, यांनी प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. तर प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजुरी चे शिक्षक ज्ञानेश्वर तुकाराम पाटील तर माध्यमिक गटात येथील ए. टी. गुजराती कन्या शाळा, नगरदेवळा चे शिक्षक रविंद्र हिलाल सूर्यवंशी यांच्या उपक्रमास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तहसिलदार कैलास चावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रविण पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या प्रदर्शनास माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, चिटणीस विलास वाणी संचालक विकास पाटील, प्रताप लोधी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, विनायक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, स्वप्निल पाटील, धनराज पाटील, मुख्याध्यापक ए. पी. गव्हाले केंद्रप्रमुख, विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील, प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, तर आभार एस. यु. गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिंदाड विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content