हातातील सुरी एकाच्या पाठीवर खूपसली !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे गावठाण येथे ऊसतोडीच्या मजूरीच्या पैश्यांवरून एका कामगाराला सुरी पाठीवर कोपसून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ भामा राठोड (वय-३५) रा.रास देहरे गावठाण ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ऊस तोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान ऊस तोडणीच्या मजूरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून सुभाष लालू राठोड रा. राजदेहरे गावठाण ता. चाळीसगाव याने एकनाथ राठोड याच्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून त्याच्या हातातील सुरीने पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली. या संदर्भात एकनाथ राठोड याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुभाष लालू राठोड रा. राजदेहरे गावठाण ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शांतीलाल पगारे करीत आहे.

Protected Content