बालकाचा जीव घेणाऱ्या कार मालकाला अटक करा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  मेहरूण तलाव परिसरात झालेल्या अपघातात विक्रांत संतोष मिश्रा  या ११ वर्षीय बालकाच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या फरार बापास तातडीने अटक करण्यासाठी डायमंड व्हाटस्अॅप गृपचे सदस्य व जळगावच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन पुकारले आहे.

 

 

डायमंड व्हाटस्अॅप गृपच्या सदस्यांनी यावेळी भविष्यात अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये अशी  अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच  जळगाव शहरात दुचाकी व चारचाकी वाहने हाकणाऱ्या अल्पवयीन (१८ वर्षे वयापेक्षा लहान) मुला-मुलींना पकडून त्यांच्या पालकांना समज देणे.   जळगाव येथे मेहरूण तलाव भागातील पायी फिरण्याच्या ट्रॅकवर रविवार, दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजेला MH 19 BU6606 या कारने स्व. विक्रांत संतोष मिश्रा याला धडक दिली. या धडकेमुळे विक्रांत याचा हकनाहक जीव गेला. ज्या कारने विक्रांतला उडविले त्याचा चालक हा अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. मात्र, तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी मुलांच्या अभिक्षण गृहात झाली. मात्र, कारचा मालक खरा संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा.जळगाव) हा घटनेपासून फरार आहे.  त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही. संशयित आरोपी कार मालकाने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. ५ सप्टेंबर २०२२ ला सुनावणी होईल. त्यापूर्वी पोलीस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलीस कोठडी  मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. जळगाव शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अल्पवयीन मुले-मुली पळवतात. त्यांच्याकडे वाहन चालक परवाने नाहीत. अशा मुला-मुलींकडे बेजबाबदार पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होऊन स्व. विक्रांत मिश्रासारखे बळी जातात. आमची नागरिक म्हणून मागणी आहे की, पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींना भर चौकात पकडावे. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज द्यावी. असे केल्याने बेजबादार पालक वठणीवर येतील.वरील दोन्ही मागण्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी अशी विनंती डायमंड व्हॉटस्अॅप गृपचे सदस्य व जळगावकर नागरिक यांनी केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी  यांनी मेहरूण तलाव परिसरात इनोव्हाची रेस लावण्याच्या नादात एका निरागस बालकाचा जीव घेणार्‍या कारच्या मालकाला अटक करावी अशी मागणी यावेळी केली.

दरम्यान, विक्रांत मिश्रा यांच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, ‘आपल्या भरधाव इनोव्हाची रेस लावून बालकाचा खून करणार्‍याने हा अपघात झाल्यानंतर परिसरातील लोकांना धमकावले होते. मेरे बापके पास बहोत पैसे है. . .मेरा कुछ नही हो सकता ! अशी दमबाजी करणार्‍या व तीन जणांना कट मारणार्‍याने माझ्या निरागस मुलाचा खून केला. मी माझा मुलगा गमावला, आता इतर कुणाचा मुलगा अशा टवाळखोरांमुळे मारला जाऊ नये हीच प्रार्थना आहे !” अशा शब्दांमध्ये मेहरूण तलावावर भरधाव इनोव्हाने उडवलेल्या विक्रांतचे वडील संतोष मिश्रा यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता अभिषेक पाटील यांना मेहरूण ट्रॅक परिसरात स्वखर्चाने ठिकठिकाणी गतीरोधक टाकण्याची घोषणा यावेळी केली.  आंदोलकांनी भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी उपाययोजना देखील यावेळी मांडल्या. 

या आंदोलनात सरिता माळी कोल्हे, दिलीप तिवारी, केतन ढाके, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, शिरीष बर्वे, शंभू पाटील, गजानन मालपुरे, अभिषेक पाटील, सचिन नारळे, ललित चौधरी, मोहन तिवारी, श्रीकांत खटोड, किशोर पाटील, अमर जैन, नितीन बरडे, गणेश सोनवणे, शोभा चौधरी, अजित नांदेडकर, विराज कावडीया, पियुष कोल्हे, अमित जगताप, विक्रांत सराफ, हितेंद्र चौधरी, लक्ष्मिकांत चौधरी, प्रकाश बालाणी, संजय चोपडा  आदी गृप सदस्य  सहभागी झाले आहेत.

 

भाग १

भाग २

भाग ३

Protected Content