घुमावल बु. येथे 650 झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा

096a07b5 e949 4538 a9d4 2050d5d38608

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घुमावल बु. येथे 650 झाडांचा वाढदिवस ग्रामस्थांनी मोठ्या थाटात आणि उत्साहाने आज साजरा केला. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी घुमावल बु. ग्रामस्थांनी ही झाडं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावली होती. ‘झाड माझ्या लेकीचं’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम गावचे लोकनीयुक्त सरपंच वसंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून मित्रांच्या मदतीने राबवण्यात येतोय.

 

घुमावल बु. ग्रामस्थांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत परिसरात माळरानात निंब, वड, पिंपळ, आवडा, जांभुळ इतर अशी 650 देशी झाडांची लागवड करत पालकांनी झाडांना आपल्या मुलीचे नावं देऊन आर्थिक खर्च पेलत झाडांची लागवड केली आणि अतिदक्षतेने संगोपन सुद्धा केले. झाड लावणा-या पालकांची या मागची भावना अशी की, माझी लेक जेंव्हा सासरी जाणार तेव्हा माहेरी तिची एक छानशी आठवण म्हणून एक झाड पर्यावरण संरक्षणासाठी असणार आहे. या झाडांचे संगोपनासाठी जाळी,कंपाउंट तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी शक्य तेवढ्या झाडांना ठिबक संच लावण्यात आले आहे. तसेच काही झाडांना पालकांनी हंड्याने वेळोवेळी पाणी दिलेय. तर कीटक नाशकाची फवारणी देखील केलीय. जमीनीतून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बुरशी नाशक द्रावन झाडांच्या मुळाशी सोडण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी लागवड करतेवेळी दोन ते अडीच फुटांचे झाडांचे रोप एका वर्षात चार ते सात फुटांपर्यत जोमदार वाढले आहेत.

 

या झाडांना एक वर्ष पूर्ण झाले म्हणुन या झाडांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहाने सेंद्रिय खताचा केक भरवत झाडांचे औक्षण गावचे जेष्ठ नागरिक मधुकर हिलाल पाटील यांच्या हस्ते करत आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी झाडांना शुभेच्छा देण्यासाठी संपुर्ण गावातील महिला, जेष्ट नागरिक, युवक, युवती,बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्राध्यापक सी.एच.पाटील यांनी पर्यावरण या विषयावर व्याख्यान केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विधानसभेचे मा.अध्यक्ष अरूणभाई गुजराथी आणि चो.सा.का.चे.मा.चेअरमन घनःशाम पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते घनःशामजी अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. अध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेसचे तालूका अध्यक्ष राजाराम पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद पाटील, जिल्हा परिषद सदस्या निलीमा पाटील, सूतगिरणीचे संचालक तुकाराम पाटील, भागवत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय पाटील, शेतकरी कृती समितीचे एस. बी.पाटील, प्रगतशील शेतकरी डाॅ.रविंद्र निकम, नरेंद्र पाटील, शिवव्याख्याते संजीव सोनवणे, मोहन पाटील, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल वाघ, संघटनेचे सरचिटणीस मनोहर पाटील आणि तालुक्याचे सर्व माननीय सरपंच तसेच तालुक्यातील पर्यावरण प्रेमी आणि पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content