राजू व अनंत सूर्यवंशींच्या विरोधात गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । पिस्तुलाचा धाक दाखवून व्याजाची रक्कम वसुली करण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीचे दागिने हिसकावल्याप्रकरणी राजू सुर्यवंशी व अनंत सुर्यवंशी यांच्या विरोधात वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय ५६,  राहणार साईनगर,दर्यापूर शिवार वरणगाव फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ५/८/२०२० रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी दोघे वरील पत्यावर राहत असतांना दुपारी २.०० ते २.३० वाजेच्या सुमारास राजू भागवत सूर्यवंशी व अनंत भागवत सूर्यवंशी दोघे राहणार १५ बंगला हे त्यांच्या सोबत दोन बॉडीगार्ड

घेऊन फिर्यादीच्या घरी आले.व त्यांनी पूर्वीच्या व्याजाचे पैशांचे देण्याघेण्याचा कारणावरून राजू सूर्यवंशी यांच्याकडे एक सिल्व्हर रंगाची पिस्तोल व दोन बॉडीगार्ड पैकी एक अनोळखी

बॉडीगार्डकडे सुद्धा एक मोठी बंदूक होती.राजू सुर्यवंशीने त्यांच्या हातातील पिस्तोल फिर्यादी संजय खन्नाच्या डाव्या बरगडीला लावून व त्यांचा भाऊ अनंत भागवत सूर्यवंशी अशांनी फिर्यादिस शिवीगाळ करीत तू जर माझे पैसे दिले नाही तर तुला आमुची मारून टाकू अशी धमकी दिली.

माझी परिस्थिती नाही म्हणून पैसे देवू शकत नाही.असे बोलताच दोघांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मागळसूत्रांची पोत,९५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दोन बागळ्या,१७ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी,१३ हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स एकूण १,६०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसकविले म्हणून  पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक  वरणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या आदेशावरून गुरुन ००३८/२०२१ भा.द.वी.कलम ३९२,४५२, ५०४,५०६,३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या आदेशावरून वरणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी फिर्यादी संजय खन्ना यांच्या जीवास धोका असल्याने दोन पोलीस कर्मचारी संजय खन्ना यांच्या संरक्षणासाठी निवासस्थानी तैनात केले आहे.

 

Protected Content