डोंगरकठोरा शिवारात केळीचे घड कापून नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील शेतात असलेल्या केळीच्या बागातील घड कापून नुकसान केल्याची प्रकार उघडकीला आला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन भागवत भिरूड (वय-४४) रा. डोंगर कठोरा ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे डोंगरकठोरा शिवारातील शेत गट नंबर ४६८ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी केळीची लागवड केली आहे. १४ जुलै रोजी सकाळी नितीन भिरूड हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या केळीच्या बागातून घड कापून चोरून नेऊन नुकसान केल्याचे निदर्शनास आले. केळीच्या घडाचे नुकसान हे गावातील लताबाई जगन्नाथ उर्फ रविंद्र सोनवणे, प्रमिला रघुनाथ थाटे आणि रजनी छगन आढाळे यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.

Protected Content