केळी व्यापार्‍यांकडून उत्पादकांची फसवणूक; गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी। तालुक्यातील सांगवी खुर्द व रावेर येथील दोन केळी व्यापार्‍यांनी शहरातील सहा तर तालुक्यातील नावरे येथील दोन अशा एकुण आठ केळी उत्पादक शेतकर्‍यांची १३ लाख ५१ हजार ६४२ रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

तालुक्यातील सांगवी खुर्द व रावेर येथील दोन केळी व्यापार्‍यांनी शहरातील सहा तर तालुक्यातील नावरे येथील दोन अशा एकुण आठ केळी उत्पादक शेतकर्‍यांची १३ लाख ५१ हजार ६४२ रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार केळी उत्पादकांनी दि. ०५ शनिवार रोजी येथील पोलीस निरीक्षक अवतारसींग चव्हाण यांचेकडे दिली आहे. संबधीत केळी व्यापार्‍यांनी मार्च ते जुन २०२० या दरम्यान शहरातील सहा तर तालुक्यातील नावरे येथील दोन केळी उत्पादकांची तालुक्यातील सांगवी खुर्द येथील रविंद्र सपकाळ व रावेर येथील सुभाष कांतीलाल पाटील या दोघे केळी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांची केळी कापून त्यापोटी काही केळी उत्पादकांना अंशत: रक्कम देवून बाकीची रक्कमेचे धनादेश दिले होते. मात्र दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला.

केळी उत्पादक शेतकर्‍यांनी वांरवार व्यापार्‍यांच्या भेटी घेवून पैशांची मागणी केली मात्र व्यापार्‍यांनी टाळाटाळ केली. अशा आशयाची तक्रार पोलीसाकडे देवून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यात यावल येथील देवनाथ भावसींग पाटील-१लाख ५२ हजार ६०४ रुपये, डॉ. गणेश लक्ष्मण रावते-तीन लाख सात हजार ९६१, अरूण कुमार सुपडू खेडकर-दोन लाख ८४ हजार ५४३, पराग विजय सराफ-एक लाख दोन हजार २९४, संदिप सतीश वायकोळे-एक लाख, संभाजी काशिनाथ लावणे-१७ हजार ९७० तर तालुक्यातील नावरे येथील देविदास उदोसींग पाटील-एक लाख ८० हजार २८६, महेंद्र शिवाजी पाटील-दोन लाख ५ हजार ९८४ रुपये अशी आठ शेतकर्‍यांची १३ लाख ५१ हजार ६४२ रुपयामध्ये फसवणूक केली असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. अजून काही शेतकरी देखील आपली फसवणुक झाल्याच्या तक्रारी देणार असल्याचे समजते.

दरम्यान तालुक्यातील सांगवी खुर्द येथील रविंद्र सपकाळ तर रावेर येथील सुभाष पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात आले. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याची ही पहीली घटना नाही या आदी ही कांदा उत्पादक, केळी व कापूस उत्पादकांच्या फसवणूकी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तालुक्यात कोणीही व्यापारी यावा आणि तालुक्यातील शेतकर्‍यांना फसवून जावे अशीच गत झाली आहे.

तक्रारदारापैकी डॉ. गणेश लक्ष्मण रावते यांनी मागील आठ दिवसापुर्वी यावल बाजार समीतीकडे तक्रार केली आहे पडताळणी अंती असे निर्दशनास येते की संबधित कमीशन एजंट व रावेर येथील व्यापारी हे परवानाधारक नाहीत मात्र त्यांनी डॉ. रावते यांनी बाजार समीतीच्या काटयावर मोजमाप केल असल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्या संदर्भात पत्र दिले आहे असे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांनी सांगीतले.

Protected Content