हिरण यांचे अपहरण करण्यांवर कारवाई होण्याबाबत निवेदन

चोपडा प्रतिनिधी । बेलापूर- श्रीरामपूर येथील स्व.गौतम हिरण यांचे अपहरणकर्ते व खुन्यावर कारवाई होऊन, न्याय मिळावा म्हणून चोपडा येथील श्री वर्धमान जैन व श्रीसंघातर्फे नायब तहसिलदार राजेश पऊळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

बेलापूर- श्रीरामपूर येथील स्व.गौतम हिरण यांचे दि. १ मार्च रोजी त्यांच्या दुकानाजवळून अपहरण झाले व दि.७ मार्च रोजी यांचा मृतदेह सापडला तसेच मनसुख हिरेण यांच्या देखील मुब्र्याच्या खाडीत मृतदेह सापडला या दोन्ही घटनांनी जैन समाजाला धक्काच बसला मितभाषी, अहिंसाच्या मार्गावर चालणाऱ्या व्यापाऱ्यांची अश्या प्रकारे निर्घृण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. वेळीच तपास न झाल्याने गुन्हेगार ही हत्या करू शकले अन्यथा त्यांचा जीव वाचविता आला असता ह्या दोघी घटनांमुळे जैन समाजात तीव्र आक्रोश असून अत्यंत संतप्त भावना दिसून येत आहे दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे गौतम हिरण च्या खुनाचा तपासासाठी एस.आय.टी. गठीत करवी असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी कोरोनाचा पादुर्भाव पाहता समाजाच्या भावना निवेदन घेऊन अवघे पाच ते सहा सद्स्यानी निवेदन दिले.यावेळी जैन समाजाचे सचिव विनोद टाटीया, उपाध्यक्ष नेमीचंद कोचर, प्रसिद्ध प्रमुख लतीश जैन, सलागार प्रवीण राखेचा, सद्स्य आदेश बरडीया, मयूर चोपडा आदी दिसत आहेत

 

Protected Content