Home Cities एरंडोल आडगाव येथील पाटचारीत पडून तरूणाचा मृत्यू

आडगाव येथील पाटचारीत पडून तरूणाचा मृत्यू

0
105

new small logo

कासोदा प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील असलेल्या आडगाव येथील ३२ वर्षीय तरूण पाटचारीजवळ गुरे चारत असतांना पाटचारीत पाय घसरल्याने बडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, दत्तात्रय इच्छाराम महाजन (वय-३२) रा.आडगाव ता. एरंडोल हा सोमवारी ४ वाजता पाटचारी नं. ७ येथे म्हशी चारत होता. म्हशी पाण्याकडे जात असल्याचे पाहून तो म्हशींना वळवत असतांना त्याचा पाय घसरला व तो पाटचारीत जाऊन पडला. पाटचारीची उंची ७ ते ८ फुट उंच असल्याने त्याला त्याचा प्राण वाचविणे अयशस्वी ठरले. सध्या पाटाचे पाणी सुरू असल्याने तो पाण्याच्या प्रवाहात गेल्यामुळे बेपत्ता झाला होता. मात्र पाट बंद करून ७ ते ८ तास झाले तेंव्हा पाण्याची पातळी खालावली व शोध घेतला असता, येथील शेतकरी लहू मोरे यांच्या शेताजवळ त्याचा मृत देह आढळून आला. त्याच्या पश्चात वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तरूणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत कासोदा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound