निर्भया प्रकरण : दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे.

 

दोषी पवन गुप्ताने फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात यावे अशी विनंती याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने पवनची याचिका फेटाळली. तसेच ३ मार्चला फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर आता आज पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे चारही दोषींना फासावर चढवणार यावर शिक्कामोर्बत झाले आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Protected Content