निर्भया बलात्कार: राष्ट्रपतींनी आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळला

download 3

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे मुकेश सिंह याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. या प्रकरणीतील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही असे पतियाळा हाऊस म्हटले होते. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दिल्ली सरकारने काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. या सर्व दोषींना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय पतियाळा हाऊस कोर्टाने दिला. त्यासाठी कोर्टाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केला होता. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. परंतू आता राष्ट्रपतींनी आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळून लावल्यामुळे आरोपींना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Protected Content