तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवीगाळ करुनको, चांगले बोल असे सांगितले असता, त्याचे वाईट वाटल्याने सांगणाऱ्या तरुणास एकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात घडली. याप्रकरणी बुधवार, ५ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील धानवड येथे कडुबा दत्तात्रय पाटील वय ३५ हा तरुण वास्तव्यास आहे. ४ ऑक्टोबर रोजी कडुबा पाटील हा त्याच्या धानवड शिवारातील शेतात होता, यादरम्यान पिंटू शिवाजी भिल हा कुणाशीतरी फोनवरुन बोलत होता, व शिवीगाळ करत होता, त्याला कडुबा पाटील याने चांगले बोल, शिवीगाळ करु नको सांगितले असता, त्याचा राग आल्याने पिटू याने कडुबा यास शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने हातावर, पाठीवर, पायावर मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी जखमी कडुबा पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी पिंटू शिवाजी भिल रा. धानवड ता. जळगाव याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी हे करीत आहेत.

Protected Content