अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर अमळनेर रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाल्याचे उघडकीला आले आहे.

यासंदर्भात असे की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा बसस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. याबबात मुंगसे गावातील भानुदास पाटील पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम देसले यांना दूरध्वनी द्वारे माहिती देण्यात आली. पारोळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुप्रिया देवरे, वन कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील आणि अधिकारी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पातोंडा येथील पशुधन अधिकारी डॉ. रविंद्र गाडे, डॉ. सतीष भदाणे यांनी वनविभाग पथकां समोर जागेवरच मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले. व लगेच जागेवरच अग्निडाग देऊन त्यांच्यावर पंचा समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पोलिस पाटील भरत निकुंभ, विजय पाटील, भानुदास पाटील, रतन वैदु, दुर्गादास वैदु, रूधांटी येथील दिलीप महाराज आदीनी सहकार्य केले.

Protected Content