गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवळ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर रविवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तरूणावर भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवक एक जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती माहिती भुसावळ बाजार पेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार रविवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीसांनी गांजाचा नशा करणारा शेख रमजान शेख रउफ (वय-३८) रा. जाम मोहल्ला, भुसावळ याच्यावर कारवाई केली. त्यांच्याजवळून नशा करण्याचे साधन हस्तगत केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख रमजान शेख रउफ याच्यावर भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर करीत आहे.

 

Protected Content