हिंगोणा येथील काँक्रिट रस्ते निकृष्ठ दर्जाचे; चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावात रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या कामांबाबत तक्रार देण्यात आली आहे.

तालुक्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी व सद्या वादग्रस्त झालेली हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध ठीकाणी शासनाचे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले कॉंक्रीट चे रस्ते हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात आले असुन व येत आहे. हिंगोणा ग्रामपंचायत व्दारे खा. रक्षाताई खडसे यांच्या निधीतून लाखो रुपयांच्या खर्चातुन राममंदीर परिसर, महाजन गल्ली, राणे वाडा, तडवी वाडा व इतर ठिकाणी करण्यात येत आहे. हे काम संबंधीत ठेकेदार हा शासनाची निविदा व अटीशर्ती धाब्यावर बसवुन कामात सिमेंटचा कमी वापर तसेच कमीथराचा निकृष्ठ प्रतिची माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे निकृष्ठ प्रतिचे कॉंक्रीट रस्ते तयार करीत असुन संबंधीत ठेकेदारास ग्रामस्थ वारंवार कामाची गुणवत्ता सुधारावी अशा सुचना देवुन देखील या सुचनांकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याचीही ओरड आहे.

२ मार्च रोजी तयार केलेल्या कॉक्रीट रस्त्याला दुसऱ्याच दिवशी तडे पडल्याने ठेकेदाराच्या कामाची गुणवता लक्षात येत असुन, संबंधीत ठेकेदाराच्या कामांबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान हा प्रकार पंचायत समितीचे बांधकाम अभियंता व ठेकेदार यांनी आर्थिक फायद्यासाठी संगनमताने निकृष्ठ काम केले जात आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी तात्काळ या ठेकेदार आणी अभियंता यांच्याकडुन करण्यात येत असलेल्या रस्ते कामात भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी संतोष शामराव साबळे योनी लेखी तक्रारी द्वारे केली आहे.

Protected Content