जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेल्याची घटना शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवार १४ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता या परिसरात राहणाऱ्या आयन शेख युनूस याने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर रविवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी आयान शेख युसूफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहे.

Protected Content