पहूर येथे पुन्हा कोरोनाचा कहर एका दिवसात २५ पॉझिटिव्ह !

पहूर ,  ता . जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे आज  कोरोनाने कहरच केला असून  एकाच दिवसात  ५० चाचण्यांपैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  एका सेवानिवृत्त शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे .

कालच पहूर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली .पहूर ग्रामीण रुग्णालयातील कोवीड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात  आले असून ११ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत . लवकरच पहूर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयात केवळ डॉ .जितेंद्र वानखेडे यांच्यावरच संपूर्ण रुग्णालयाचा कार्यभार आला आहे .त्यांच्या मदतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी देण्याची आवश्यकता आहे . प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पहूर पेठ आणि पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे .मात्र तरीही कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय आहे .पोलीस प्रशासनातर्फे जनतेला मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे . परंतू काही बेजबाबदार नागरिक विना मास्क फिरतांना आढळत असल्याने तसेच लग्नकार्य , बाजार आणि सार्वजनिक उत्सवांमधून लोकांची मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाची  साखळी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे .

दरम्यानच्या काळात कोरोना मुक्त झालेले पहुर १५ जानेवारी पासून पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे . काल पर्यंत ४३ बाधितांची नोंद झालेली होती .आज त्यात २५रुग्णांची भर पडली असून संख्या ६८ वर पोहोचली आहे. पहूर पेठ आणि पहूर कसबे गावातील करोना विषाणू संक्रमणाचीवाढती साखळी खंडित करण्यासाठी जनता कर्फ्यूचा विचार करण्याची गरजेचे  आहे .  विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून जनतेनेही स्वतःहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे .

वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज ६० वर्षावरील १९ वृद्धांना तर ४५ वर्षावरील ५ जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ . जितेंद्र जाधव यांनी दिली .

 

 

 

 

 

Protected Content