कोरोना झाल्याच्या अफवेवरून ग्रामविकास अधिकार्‍याला धमकी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येतील ग्रामविकास अधिकार्‍यासह दोन ग्रामपंचायत कर्मचार्‍यांशी हुज्जत घालत दोघांनी धमकावल्याचा प्रकार घडला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की, धीरेंद्र रमेश निकुंभ हे साकळी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते गुरूवारी ड्युटीवर असतांना सफाई कर्मचारी जीवन खंडू कंडारे याने कार्यालयात येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. लिपिक पंढरीनाथ ओंकार माळी व मनवेल येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी हे असतांना कंडारे याने ग्रामविकास अधिकार्‍यांना धमकावले. तो म्हणाला की, मला कोरोना झाल्याची अफवा गावात कुणीतरी पसरवली आहे. यामुळे माझ्या जवळ कुणीही येत नाही व मला पिण्यासाठी दारूही मिळत नाही. या सफाई कर्मचार्‍याची प्रकृती बिघडल्याने साकळी प्राथमिक आरोग्य केन्दात उपचारानंतर त्याला वैद्यकीय अधिकीरी यांनी घरातच राहण्याचा सल्ला दिला होता परन्तु त्यांना गोळ्या फेकुन दिल्यानंतर त्याने ग्रामविकास अधिकारी यांच्या शी वाद घातला. आपल्याला कोरोना झाल्याची अफवाही ग्रामविकास अधिकारी धिरेन्द्र निकुंभ यांनीच गावात पसरवली आहे असे आरोप त्याने केले. दरम्यान, कंडारे हा खोटया गुन्ह्यात अडकण्याचे सांगुन त्याच्याकडुन माझ्या जिवाला धोका असल्याचे दाट शक्यता असुन यावेळी त्याच्या सोबत असलेला संजय सदाशिव माळी यानेही आपल्याला धमकावल्याची तक्रार ग्रामविकास अधिकार्‍यांनी केली असून या दोघांवर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. यावल पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना हा अर्ज देण्यात आला आहे.

Protected Content