यावल येथे सामूहिक नमाज पठणानंतर झाली रमजान ईदची सांगता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात पारंपारिक पध्दतीने मुस्लीम धर्मातील सर्वात पवित्र रमजान ईदची ईदगाह मैदानावर आणि शहरातील विविध ठिकाणच्या मस्जिद मध्ये मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान ईदचा सण सामुहिक नमाज पठणानंतर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. देशात बंधुभाव व शांतता नांदावी, या करीता सामूहिक नमाज पठणानंतर प्रार्थना करण्यात आली.

ईस्लाम धर्मातील पाच मुळ त्तत्वापैक्की एक म्हणुन रमजान महीना ओळखला जातो. प्रत्येक मुस्लीम धर्मातील समाज बांधवास ही पाच मुळ तत्वे पाळवीच लागतात, असा अल्लाहने दिलेला आदेश आहे, असं म्हटले जाते. दरम्यान रमजानच्या पवित्र महीन्यात रोजा करणे हा प्रार्थना करण्याचा व अल्लाह जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठी रोजा करणं चांगले असल्याचे म्हटंल जाते.

यावल शहरात काल १० एप्रील बुधवार रोजी चंद्रदर्शना नंतर ईदच्या विविध खरेदी साठी मुस्लीम बांधवांनी प्रमुख बाजार पेठेत एकच गर्दी केली होती. आज ११ एप्रील गुरूवार रोजी यावल शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नववस्त्र परिधान करून मौलाना शम्मीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील विविध मस्जिदी मध्ये ईमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक नमाज पठण करण्यात आले व रमजानच्या पवित्र महीन्यांच्या रोजा ( उपवासाची ) सांगता झाली.

मुस्लीम बांधवांना ईदगाह मैदानावर रमजान ईदची शुभेच्छा देण्यासाठी रावेर विधानसभेचे आ. शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रा मुकेश येवले, असलम शेख नबी, हाजी गप्फार शाह, राष्ट्रवादीचे विजय पाटील, कदीर खान फैजान शाह, अनिल जंजाळे, हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, विजय सराफ, हाजी हकीम खाटीक, नाना बोदडे, हाजी अय्याज खान, सईद शेख यांनी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्यात .

Protected Content