कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही.जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

VG Siddhartha ccd 1

मुंबई प्रतिनिधी । कॅफे कॉफी डे चे संस्थापक व्ही.जी. सिध्दार्थ हे 29 जुलै पासुन बेपत्ता झाले होते. आज सकाळी मंगळुरूतील नेत्रावती नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगळुरूतील होजी बाजाराजवळ नेत्रावती नदीच्या पात्रात सकाळी 6.30 च्या सुमाराला कोणाचा तरी मृतदेह तरंगत असल्याची माहिती मंगळुरू पोलिसांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर तो मृतदेह व्ही.जी. सिद्धार्थ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या निधनामुळे 240 शहरांमधील 1750 रिटेल आउटलेट आज बंद राहणार आहेत. सिद्धार्थ यांच्या मृत्यूमुळे दक्षिण राज्यात 3 कॉफी जिल्ह्यांत चिक्कमगलुरु, हासन आणि कोडुगू मध्ये सर्व कॉफी क्षेत्रातील कामगारांना आणि मजूरांना 1 दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आली आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले एस.एम.कृष्णा यांचे जावई आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यात कोटेपुरा परिसरात नेत्रावती नदीवरील एका पुलाच्या परिसरात सिद्धार्थ अखेरचे दिसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

Protected Content