त्रिसदस्य समिती घेणार उमेदवारांची मुलाखत

kapil dev

मुंबई प्रतिनिधी । टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह विविध पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले असून हे अर्ज करण्याची मुदत ही संपली आहे. कपिल देव यांच्यासोबत माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी हे त्रिसदस्य समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे.

मात्र बीसीसीआय नव्या नियमानुसार समिती प्रशिक्षकाची निवड करणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे संघ प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच नवा वाद उभा राहिला आहे. त्यामुळे समितीमधील सदस्य इतर पदावर असल्याने निवड प्रक्रियेत अडचण येईल अशी चर्चा होत आहे. कपिल देव भारतीय क्रिकेट असोसिएशन समितीचे सदस्य आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यासोबत टीव्हीवर विशेषज्ञ म्हणून काम पाहतात. याशिवाय गायकवाड बीसीसीआयच्या समितीचे सहकारी आहेत. तर शांता रंगास्वामी आयसीएच्या संचालक आहेत. मुलाखत घेण्यापूर्वी बीसीसीआय़चे लोकपाल डीके जैन याबाबत अंतिम निर्णय घेतील. इतर पदावरील हितसंबंधाच्या अडचणीबद्दल याआधी डायना इडुल्जी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनीसुद्धा पत्र लिहून याबद्दल विचारणा केली होती.

Protected Content