‘विस्डेन’च्या यादीत ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश

virat ashvin

नवी दिल्ली वृत्तसंस्था । २०१९चे वर्ष संपत असतानाच हे दशकही संपुष्टात येत आहे. सोमवारी विस्डेनने टेस्ट टीम ऑफ द डिकेडची (दशकातील कसोटी टीम) घोषणा केली आहे. या ११ क्रिकेटपटूंमध्ये दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये तीन इंग्लंडचे, दोन ऑस्ट्रेलियाचे, दोन दक्षिण आफ्रिकेचे आणि एका श्रीलंकन खेळाडूचा समावेश आहे. विस्डेनने निवडलेल्या या कसोटी टीममध्ये एकाही पाकिस्तानी क्रिकेटपटूचा समावेश नाही.

११ खेळाडूंच्या या यादीत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी ३ खेळाडू हे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे आहेत. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांचे २-२ खेळाडू आहेत. तर श्रीलंकेच्या केवळ एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. लॉरेन्स बूथ, जो हार्मन, फिल वॉकर आणि यास राना या चार सदस्यांच्या समितीने या ११ क्रिकेटपटूंची निवड केली आहे.

अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), कुमार संगाकारा (श्रीलंका), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), बेन स्टोक्स (इंग्लंड), एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका), रविचंद्रन अश्विन (भारत), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) आणि जेम्स अँडरसन (इंग्लंड) असे दशकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटपटू आहेत.

Protected Content