सामन्यादरम्यान अंपायरला शिवीगाळ, मिचेल मार्शला ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून लाखोंचा दंड

 

कॅनबेरा : वृत्तसंस्था । पंचाने चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने मिचेल मार्शचा पारा चढला. मार्शने भर मैदानातच अंपायरला शिव्या घातल्या. या शिव्या घालणं मार्शला चांगलंच महागात पडलं आहे. मार्शवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दंडात्मक कारवाई केली आहे.

मार्शने अंपायरला शिव्या दिल्याने त्याच्याकडून नियमांचं उल्लंघन झालं. मार्शकडून आचार संहितेच्या लेव्हल १ चं उल्लंघन झालं. यामुळे मार्शला तब्बल ५००० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच २ लाख ७९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मार्शने ही दंडात्मक रक्कम भरण्याचे मान्य केले. सुदैवाने त्याच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात आली नाही. जर असे झाले असते तर त्याला पुढील काही सामन्यांना मुकावे लागले असते.

 

शनिवारी पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना खेळण्यात आला. पर्थचा संघ फलंदाजी करत होता. ऑलराऊंडर मिचेल मार्श बॅटिंग करत होता. स्पीनर स्टीव ओ कीफ सामन्यातील १३ वी ओव्हर टाकत होता.

या ओव्हरमधील ५ वा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने गेला. मार्शने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. बॅटला चेंडूचा स्पर्शही झाला नाही. हा चेंडू विकेटकीपरने अचूक झेलला. यावर कॅचसाठी अंपायरकडे जोरदार अपिल करण्यात आली. अंपायरने मार्शला तडक बाद घोषित केलं. अंपायरने मार्शला चुकीच्या पद्धतीने बाद घोषित केलं. यामुळे मार्शला राग अनावर झाला. मार्शने आपला संताप व्यक्त केला. बाद दिल्याने मार्श ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस त्याने भर मैदानात अंपायरला शिवीगाळ केली.

Protected Content