Home क्राईम भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या वादातून एकाची हत्या !

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या वादातून एकाची हत्या !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या घराजवळ भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या शेजाऱ्याचा एका तरुणाने धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे.

 

ब्रिजमोहन (वय ५७) हे प्राणीप्रेमी होते, ते नेहमी अशा कुत्र्यांना खाऊ घालत होते. रविवारी रात्री त्यांचा शेजारी प्रल्हाद (वय २१) याच्यावर कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे प्रल्हादने ब्रिजमोहन यांच्याशी भांडण केले. प्रल्हादने ब्रिजमोहन यांना सांगितले की, कुत्र्यांना असे खाऊ घालण्यामुळे या भागात कुत्र्यांकडून हल्ला होण्याची घटना घडेल. यावेळी दोघांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. परंतू त्यानंतर संतापाच्या भरात प्रल्हादने घरातून एक धारदार चाकू आणत थेट ब्रिजमोहन यांना भोसकले. उपचारांदरम्यान ब्रिजमोहन यांचा मृत्यू झाला.


Protected Content

Play sound