प्राण्यांमुळे कोरोना प्रसाराचे ठोस पुरावे नाहीत

 

 

 

 

 

बीजिंग वृत्तसंस्था । कोरोना विषाणू उत्पती तपासण्यासाठी चीनमधील वुहान शहरात गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. प्राण्यांमुळे कोरोना प्रसाराचे  ठोस पुरावे नाहीत , असे या पथकाने सांगितले

 

डिसेंबर २०१९ च्या आधी शहरात कोरोना व्हायरसचे कोणतेही संकेत नव्हते असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि चिनी तज्ञांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “डिसेंबर २०१९ च्या आधी येथील लोकांमध्ये संसर्ग झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. याआधी शहरात फैलाव झाल्याचेही कोणते पुरावे सापडलेले नाहीत”.

 

वुहान येथूनच संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं होतं. वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाला आणि जगभरात पसरला असा दावा केला जात आहे. मात्र याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.

 

 

जागतिक आरोग्य संघटनेचे बेन एम्ब्रेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वुहानमधील तपासात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र मोठा बदल झालेला नाही. पथकाला डिसेंबर २०१९ मध्ये वुहान मार्केटबाहेर प्रसार झाल्याचे पुरावे सापडले आहेत अशी माहिती दिली आहे.

नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे संसर्ग झाला यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. वटवाघूळाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या करोनाचं संसर्ग इतर प्राण्याच्या मार्फत माणसांपर्यंत पोहोचल्याची शक्यता असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.

 

बेन एम्ब्रेक यांनी चिनी वैज्ञानिकांसोबत आपली सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता.

Protected Content