जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने वाचले जखमी हरणाच्या पिल्लाचे प्राण (व्हिडिओ )

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना साकेगाव शिवारात हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांनी जखमी केल्याचे आढळून आले. एएसआय पठाण यांनी त्या जखमी पिल्लाला वनविभागाच्या स्वाधीन केले.  

भुसावळ बाजार पेठ पोलीस स्थानकाचे एएसआय तस्लीम पठाण हे जळगाव येथून भुसावळकडे येत असतांना त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या ठिकाणी सद्गुरु पेट्रोल पंप साकेगाव शिवारात कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लाला जखमी केल्याचा एका जागरूक नागरिकाने भ्रमणध्वनीद्वारे कळविले.  त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पिल्लू ताब्यात घेतले.  त्या जखमी पिल्लास भुसावळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्या पिल्लास भुसावळ शहरातील यावल रोड येथे एएसआय पठाण जळगाव वन विभाग वनक्षेत्र मुक्ताईनगर वनोपज तपासणी नाका येथे वनरक्षक डी. जी. रायसिंग यांच्या ताब्यात दिले. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2913104892344895

 

Protected Content