धनंजय कोल्हे यांना नॅशनल नोबिलिटी अ‍ॅवॉर्ड प्रदान

dhananjay kolhe award

जळगाव प्रतिनिधी । आसोदा येथील चतुरस्त्र लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते धनंजय कोल्हे यांना आज राळेगणसिध्दी येथील कार्यक्रमात नॅशनल नोबिलिटी अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

आसोदा येथील धनंजय कोल्हे यांना आज परिस स्पर्श फाऊंडेशनतर्फे नॅशनल नोबिलिटी अ‍ॅवॉर्ड प्रदान
करण्यात आला. या कार्यक्रमात समाजहितासाठी विविध उपक्रम राबविणार्‍या १८ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते धनंजय कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

धनंजय कोल्हे यांनी ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले आहेत. अलीकडेच त्यांनी लेवा आयकॉन्स या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले असून यात लेवा समाजातल्या मान्यवरांच्या कर्तृत्वाबाबत सचित्र व सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जगभरातून कौतुक करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांनी विविध पुस्तकांचे लेखन केले असून सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला आहे. दरम्यान, नॅशनल नोबिलिटी अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दल धनंजय कोल्हे यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content