कृ. उ. बा. स. व्यापाऱ्यांना पाठींब्यासाठी दाणा बाजार व्यापाऱ्यांचा एक दिवसीय बंद (व्हिडिओ)

Sequence 01.00 05 28 03.Still016

जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची संरक्षक भिंत पुन्हा बांधून देण्यात यावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनतर्फे बेमुदत बंद पुकारण्यात आला असून त्याला दि ग्रेन किराणा अँड जनरल असोसिएशनने पाठींबा देऊन एक दिवसीय बंद पळाला आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची सुमारे तीनशे मीटर लांबीची संरक्षक भिंत बाजार समितीच्या सभापतींनी पाडल्याने व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांच्या बंद नंतर सभापती कैलास चौधरी यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन संरक्षक भिंत दोन दिवसात पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन दिवसांनंतरही संरक्षक भिंत बांधण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने व्यापारी असोसिएशन मार्केट तर्फे बेमुदत बंद ठेवण्यात आले आहे. बाजार समितीच्या बंदला दाणा बाजार येथील दि ग्रेन किराणा अँड जनरल असोसिएशन यांनी एक दिवसीय बंद पुकारून पाठिंबा दिला आहे.
दाणा बाजार एक दिवस बंद असल्याने बाजारांमधील जवळपास दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. बंद पुकारण्यात आल्यानंतर तेथे दि ग्रेन किराणा अँड जनरल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, उपाध्यक्ष अशोक दूत, लक्ष्मिकांत वाणी, अश्विन सुरतवाला, शंकर कोकणी, अरविंद मणियार, सतीश जवानी, केशव तेजवाणी, रितेश मंधन, पप्पू मंधान आदीं उपस्थित होते. दरम्यान, जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशन मार्फत २५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड मधील कामकाज बंद ठेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

 

Protected Content