पिंप्राळ्यातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील आदित्य हॉस्पिटल समोरून एका तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मयुर गणेश भालेराव (वय-३१) रा. शिवराणा नगर, पिंप्राळा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १५ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मयुर हा त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएन ८४७४) ने पिंप्राळा परिसरातील आदित्य हॉस्पीटलजवळ आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्याने परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहेत.

Protected Content